Rahul Gandhi is the number one candidate for the post of prime minister - Kumaraswamy
Rahul Gandhi is the number one candidate for the post of prime minister - Kumaraswamy 
देश

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधीच नंबर एकचे उमेदवार - कुमारस्वामी

सकाळवृत्तसेवा

बेंगलोर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधान पदासाठी नंबर एकचे उमेदवार आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची गरज आहे. देशात एकाच पक्षाच्या बहुमतातील सरकारपेक्षा आघाडी सरकारने चांगले प्रशासान दिले आहे. असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी व्यक्त केले.

काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर (जेडीएस) या दोन्ही पक्षात कसलेही मतभेद नाहीत. काम करताना माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचाही सल्ला घेतला जातो. त्यांनी फेब्रूवारी 2018 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात पुरवणी अर्थसंकल्पाचा मला सल्ला दिला होता. तो मी विरोध म्हणून नाहीतर सल्ला म्हणूनच स्विकारला. पण एक नवीन सरकार स्थापन केल्यानंतर, आम्हाला असे वाटले चांगला अर्थसंकल्प सादर करावा. यावर सिद्धारमैया यांनीही सहमती दर्शवली. भाजपने याला विरोध दर्शवत ते बाहेर पडले पण आम्ही दोन्ही पक्षांनी ठाम भूमिका घेत अर्थसंकल्प मंजूर करून घेतला होता. आघाडी मध्ये वेगवेगळी मते असू शकतात. परंतु, त्यामुळे आमच्यात मतभेद निर्माण होत नाहीत. असेही कुमारस्वामी म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT