Kiren Rijiju Rahul Gandhi esakal
देश

Kiren Rijiju : देशाची बदनामी केली तर गप्प बसणार नाही; कायदा मंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावलं

Rahul Gandhi News: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी आज राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केलीये.

सकाळ डिजिटल टीम

लंडनहून परतल्यानंतर राहुल गांधी आज संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी आज राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केलीये. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप माफीची मागणी करत आहे.

या मुद्द्यावरून सभागृहातही प्रचंड गदारोळ सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी आज (गुरुवार) संसदेत येऊ शकतात.

दरम्यान, अशा परिस्थितीत माध्यमांशी बोलताना कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केलीये.

केंद्रीय कायदा मंत्री काय म्हणाले?

रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधींनी देशाची बदनामी केलीये. देशाचे नागरिक म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही. लंडनच्या चर्चासत्रात राहुल गांधी जे बोलले त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.

त्यांनी लोकशाही, न्यायव्यवस्था आणि देशाचा अपमान केला आहे. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे.'

लंडनहून परतल्यानंतर राहुल गांधी आज संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. यादरम्यान ते लंडनमध्ये दिलेल्या भाषणावरून सुरू असलेल्या वादावर बोलू शकतात.

राहुल गांधी लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते, भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर चांगलाच गदारोळ सुरू असून, सत्ताधारी भाजप या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांचीही प्रतिक्रिया समोर आलीये.

पित्रोदा म्हणाले, 'राहुल गांधींनी माफी मागावी लागेल असं काहीही बोललं नाही. भारतासारख्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT