Rahul Gandhi on how he wanted a girl for marriage sonia gandhi and grandmother indira gandhi  
देश

Rahul Gandhi On Marriage : लग्नासाठी कशी मुलगी हवीय? राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत यात्रा जोडो यात्रेत चालत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी सतत वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना त्यांच्यालग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी दिलेलंउत्तर देखील खूप मनोरंजक होतं.यावेळी राहुल गांधी यांनी त्यांची आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल देखील भाष्य केलं.

भारत जोडो यात्रा मुंबईत असताना राहुल गांधी यांना त्यांच्या लग्न बद्दल प्रश्न विचारण्यात आला, यावेळी राहुल गांधी यांनी त्यांना लग्नासाठी कशी मुलगी हवी याबद्दल उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला अशा स्त्रीशी लग्न करायचे आहे का, जिच्यामध्ये तुमच्या आजीसारखे गुण असतील, लग्नासाठी तुम्हाला अशीच मुलगी हवीय?

राहुल गांधींना कशी मुलगी हवीय?

यावर प्रश्नावर बोलताना राहुल म्हणाले की, हा एक मजेशीर प्रश्न आहे. मला अशी स्त्री हवी आहे जिच्यात माझी आई आणि आजी या दोघांचेही गुण असतील. तेच ठिक राहील. दरम्यान राहुल गांधी यांनी इंदीरा गांधी या त्यांच्या आयुष्याचं प्रेम आहेत, तर दुसरं त्यांची आई असल्याचं देखील सांगितलं.

मॅशेबल इंडिया (mashable india) या यूट्यूब चॅनलच्या बॉम्बे जर्नी स्पेशल एपिसोडमध्ये राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलले आहेत. या मुलाखतीचा व्हिडिओ मंगळवारी यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जेव्हा कोणी पप्पू उल्लेख करतो त्याचं तुम्हाला वाईट वाटतं का? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी थेट नाही, ही प्रपोगंडा मोहीम आहे आणि ती त्याच्या ऱ्हदयातली गोष्ट आहे. ही भीती त्या लोकांमध्ये असते, ज्यांच्या आयुष्यात काहीच घडत नाही.

यानंतर राहुल गांधी यांनी तुमच्या आजीला भारताची आयर्न लेडी म्हटलं जातं यावर बोलताना राहुल म्हणाले की, त्यांना गूंगी गुडिया देखील म्हणत.जे माझ्यावर चोवीस तास हल्ला करतात, तेच लोक इंदिरा गांधींना मुकी बाहुली म्हणत. मग ती महिला आयर्न लेडी बनली. त्या नेहमीच आयर्न लेडी होत्या, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT