Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi on NDA: ''घटकपक्ष नाराज, एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं'', राहुल गांधींचा मोठा खुलासा

संतोष कानडे

Rahul Gandi Congress News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. परंतु यावेळी देशातील जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिलं नाही. त्यामुळे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने देशामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं.

केंद्र सरकारमध्ये जराही गडबड झाली तर एनडीएचं सरकार कोसळू शकतं, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी नवीन सरकारबद्दल भाष्य केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, देशाच एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. परंतु एनडीएमधील काही घटकपक्ष आमच्या संपर्कात आहेत. सरकारमध्ये जराही गडबड झाली तर मोदी सरकार कोसळू शकतं. काही पक्षांमध्ये नाराजी असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपने दहा वर्षे रामाच्या नावाने काढले. परंतु अयोध्येतल्या लोकांनीच भाजपचा पराभव केला. भाजप द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. भविष्यात मोठं यश मिळणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशे पारचा नारा दिला होता. परंतु घटकपक्षांना मिळूनही भाजपला तिनशेपार करता आलेले नाहीत. भाजपविरोधात देशामध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. त्यातच एनडीएला भाजपकडून गोंजारण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT