rahul gandhi sakal
देश

'...ऑफर संपत चाललीय'; पेट्रोल-डिझेल दरावरून राहुल गांधींचा केंद्राला टोला

कॉंग्रेसचे पूर्वअध्यक्ष राहूल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसल्याने केंद्र सरकारवर निशाना साधलाय.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसल्याने केंद्र सरकारवर निशाना साधलाय. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "पटापट आपल्या गाड्यांच्या टाक्या फुल्ल करुन घ्या. कारण मोदी सरकारची निवडणुकांची ऑफर संपत आली आहे. निवडणुकांच्या काळात मागील काही दिवसांपासून उत्तरप्रदेशसहित पाच राज्यांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नाहीत. आता निवडणुका संपल्यावर या भावामध्ये वाढ होणार आहे." काही रिपोर्टनुसार कच्च्या तेलाच्या भावावरुन पेट्रोल आणि डिझेलचे भाव ठरवले जातात. त्यानुसार भावात १० ते १२ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

आयसीआयसाआय च्या सिक्युरिटी रिपोर्टनुसार कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात १२.१ प्रतिलीटर वाढ करावी लागणार आहे. त्याबरोबर तेल कंपनीच्या नफ्याला जोडलं तर जवळपास १५.१ रुपयांपर्यंत वाढ करावी लागू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव गुरुवारी १२० डॉलर प्रतिबॅरल इतके होते. जे मागील नऊ वर्षातील उच्चांकी भाव होते.

दरम्यान शुक्रवारी याचे भाव घसरुन १११ रुपये प्रतिबॅरल इतके झाले. सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबर सध्या भारतातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभुमीवर सध्या काही काळात पेट्रोलचे भाव वाढले नाहीत. आता पेट्रोलचे भाव वाढणार आहेत.

गाडीच्या टाक्या पटापट फुल्ल करा असं आवाहन राहूल गांधी यांनी केलं आहे. दरम्यान उत्तरप्रदेशमधील निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान ऊद्या (ता.७) होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे. सध्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता पेट्रोलचे भाव वाढतील असा टोला राहूल गांधींनी मोदींना लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT