Rahul Gandhi Team eSakal
देश

"मी विचार करेन"; अध्यक्षपद स्वीकारण्यावर राहुल गांधींचं स्पष्टीकरण

आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.

सुधीर काकडे

आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस कार्यकारीणीची बैठक सुरु आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, अशोक गहलोत, आनंद शर्मा यांच्यासहित पक्षाचे 52 वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत नवीन अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाध्यक्षाचं पद स्विकारण्याची विनंती करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना विनंती करण्यात आली. त्यावर राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रीया दिल्याचं सांगण्यात येतंय. तसंच पक्षाच्या नेत्यांकडून विचारधारेच्या पातळीवर स्पष्टता हवी असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, येत्या 1 नोव्हेंबरपासून काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे लवकरच पक्षाध्यक्ष पद स्विकारतील, असंही काही नेत्यांनी सांगितलंय. तसंच सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत टीकाकारांना, खासकरुन ‘जी -२३’ नेत्यांना उद्देशून काही परखड मते मांडली आहेत. मी आपल्याशी खुलेपणाने बोलते, तर आपणही माझ्याशी बोलावं, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्याशी बोलणं थांबवा असंही त्यांनी नेत्यांना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT