Acharya Pramod Krishnam Allegations On Rahul Gandhi Esakal
देश

Raebareli: "प्रियंका गांधींच्या विरोधात षडयंत्र," माजी काँग्रेस नेत्याचे राहुल यांच्यावर खळबळजनक आरोप, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: 2004 मध्ये इंदिरा गांधींच्या सून सोनिया गांधी यांनी येथून निवडणूक लढवली आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर आता राहुल या जागेवरून लढणार आहेत.

आशुतोष मसगौंडे

गांधी परिवाराची पारंपरिक जागा असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातून यंदा राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, येथून प्रियंका गांधी यांना तिकिट न मिळाल्याने माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करत प्रियंका यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे. (Acharya Pramod Krishnam Allegations On Rahul Gandhi)

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे बोलताना काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "मी आधीच सांगितले होते की, राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा यांना निवडणूक लढवू देणार नाहीत... त्यांच्या कुटुंबात प्रियंका गांधींच्या विरोधात मोठे षडयंत्र केले जात आहे. आणि प्रियंका कुटुंब आणि पक्षाच्या षडयंत्राच्या बळी ठरल्या आहेत. राहुल गांधींना अमेठीतून निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवायला हवी होती."

गेल्या वीस वर्षांपासून रायबरेलीतून खासदार झालेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यामुळे सोनिया गांधी नुकत्याच राजस्थानमधून राज्यसभेत गेल्या आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर सोनिया यांच्या अनुपस्थितीत प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवत आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करतील अशा चार्चा होत्या. मात्र, येथून आता राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वर्तूळात प्रियंका यांच्या राजकीय भविष्याबाबत चर्चा रंगत आहेत.

रायबरेली मतदारसंघाचा इतिहास

रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर फिरोज गांधी यांनी 1952 मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 1958 मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली.

त्यांच्या निधनानंतर इंदिरा गांधींनी १९६७ च्या निवडणुकीत या जागेवरून उमेदवारी दाखल करून राजकीय कारकिर्द सुरू केली. अशा परिस्थितीत ही जागा गांधी घराण्याची पारंपरिक जागा बनली.

2004 मध्ये इंदिरा गांधींच्या सून सोनिया गांधी यांनी येथून निवडणूक लढवली आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. आता सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी लोकसभेच्या जागेवरून गांधी घराण्याचा वारसा सांभाळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT