Rahul Gandhi 
देश

PFIच्या देशभरातील छाप्यांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, जातीयवाद...

दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे समोर आल्यानं या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात राष्ट्रीय तपास एजन्सीकडून (NIA) पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. तसेच शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केरळमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्व प्रकारचा जातीयवाद आणि हिंसाचार मग तो कुठूनही आलेला असेल हे सर्व एकसारखेच आहेत, त्यामुळं त्याचा सामना केला पाहिजे. यासाठी झिरो टॉलरन्स ठेवला पाहिजे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पीएफआयच्या कार्यालयांवरील छाप्यांबाबत भाष्य केलं पाहिजे.

दरम्यान, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे समोर आल्यानं पीएफआय या संघटनेच्या केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह १० राज्यांमधील कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी झाली. यामध्ये संघटनेच्या शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे.

टेरर फंडिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पीएफआय संघटना ईडीच्या रडावर आहे. या छापेमारीमुळं येत्या काळात संघटनेवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

Pune Akashvani : पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरूच राहणार; वृत्त विभाग बंद न करण्याचा केंद्राचा निर्णय

Chakur News : तिघांच्या मृत्यनंतर महामार्ग प्रशासनला जाग; चाकूर शहरात येणारा रस्ता बंद, सत्यसाई रोड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT