rahul gandhi  sakal
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींचा सरकारी बंगला घेण्यास नकार, खासदारकी बहाल झाल्यावर पुन्हा मिळणार होता जुना बंगला

राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर सरकारी बंगला मिळणार होता, पण तो बंगला घेण्यास गांधींनी नकार दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Government House:राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर लोकसभा हाउसिंग सोसायटीने त्यांना 12 तुघलक लेन येथे बंगला दिला होता, मात्र आता काँग्रेस नेत्याने तो घेण्यास नकार दिला आहे.

मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात त्यांना गुजरात उच्च न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. २ वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. खासदारकी गेल्याने त्यांचा बंगलाही काढून घेण्यात आला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे, त्यानंतर त्यांना १२ तुघलक लेनचा जुना बंगलाही देण्यात आला आहे. आता राहुल गांधींनी त्यांचा जुना बंगला घेण्यास नकार दिला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी यासाठी लोकसभा हाउसिंग सोसायटीला पत्र लिहिले आहे.राहुल गांधी यांचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी लोकसभेच्या गृहनिर्माण संस्थेने त्यांना १२ तुघलक लेन येथे बंगला दिला आहे. मात्र, त्यांना बंगल्याबाबत प्रश्न विचारला असता, संपूर्ण भारत माझे घर असल्याचे त्यांनी सांगितले होते.

राहुल गांधींना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली?

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले होते, 'नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? राहुल यांच्या या विधानाबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर कलम ४९९, ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर राहुलचे सदस्यत्व गेले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT