RAHUL-GANDHI.jpg 
देश

Video : राहुल गांधींचा हा हटके डान्स बघितला का?

वृत्तसंस्था

रायपुर (छत्तीसगड) : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. आज देखील त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत.

दरम्यान, छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुरमध्ये सध्या तीन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव सुरु आहे. या महोत्सवास आज राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी झालेल्य़ा कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आदिवासी नृत्य करत सर्वांची मने जिंकली. तसेच त्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वागत केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहूल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदी सरकार हे देशातील 'सर्वधर्म समभाव' या संकल्पनेला धक्का पोहचवत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. सध्याच्या आर्थिक स्थितीवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

दरम्यान, या आदिवासी महोत्सवात 25 राज्यांमधील आदिवासी बांधव आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. या महोत्सवात सहा देशांचे प्रतिनिधी व त्यांचे आदिवासी बांधव मंडळ सहभागी होणार आहे. आज रात्री थायलंड, बांग्लादेश, बेलारूस, मालदीव, युगांडा या देशांमधील कलाकार नृत्य सादर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT