Rahul Gandhi Sakal
देश

सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर राहुल गांधी थकले, विश्रांतीसाठी मागितला वेळ

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना उलट सुलट प्रश्न विचारले. यावेळी आपण यंग इंडियनमधून (Young Indian Pvt. Ltd) एकही पैसा काढला नसल्याचे उत्तर दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सलग तीन दिवस सतत प्रदीर्घ चौकशी सुरू असल्याने राहुल गांधी यांनी विश्रांतीसाठी वेळ मागितला आहे. (Rahul Gandhi ED Inquiry)

राहुल गांधींची ईडीची चौकशी नॅशनल हेराल्डची (National Herald Case) मालकी असलेल्या काँग्रेसने प्रवर्तित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडद्वारे (AJL) प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियनच्या मालकीचे आहे. याच प्रकरणात गांधींची चौकशी सुरू आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर सुट्टी देण्याची विनंती राहुल गांधींनी केली.

ईडीने देखील त्यांची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची आज चौकशी होणार नसून त्यांना शुक्रवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. तिसऱ्या दिवशी गांधी यांची 13 तासांहून अधिक वेळ चौकशी झाली. त्यानंतर साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सांगितले की, यंग इंडियन ही नफा नसलेली कंपनी असून, जी कंपनी कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार स्थापन करण्यात आली आहे. त्यातून आपण एक पैसाही काढलेला नाही. या उत्तरानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या या दाव्यावर प्रतिप्रश्न उपस्थित केला. संबंधित कंपनी 2010 मध्ये स्थापन झाल्यापासून एखादं समाजकार्य केले असेल तर, त्या संबंधित कागदपत्रं आणि पुरावे सादर करावे असे सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT