Rahul Gandhi Slam BJP PM Modi in INDIA alliance rally over Arvind Kejriwal arrest Lok sabha election 2024  
देश

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...; IPLचे उदाहरण देत राहुल गांधींचा हल्लाबोल

INDIA alliance rally in Ramlila Maidan Latest News : दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीकडून महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रोहित कणसे

INDIA alliance rally in Ramlila Maidan Latest News : दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीकडून महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून सत्ताधारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला बोल करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीकडून या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले की, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. जेव्हा बेईमानीने अंपायर वर दबाव टाकून, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात तेव्हा क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हटले जाते. आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहे.

अंपायर कोणी निवडले, नरेंद्र मोदी यांनी... मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आली... त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ४०० जागा जिंकण्याची घोषणा केली.. पण ईव्हीएम, मॅच फिक्सिंग, प्रेसवर दबाव टाकूनही यांचा आकडा १८० च्या पुढे जाणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

देशात काँग्रेस सर्वात मोठा विरोधीपक्ष आहे. आमचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सर्वात मोठ्या विरोधीपक्षाचे सर्वच बँक अकाउंट बंद करण्यात आले आहेत. आम्हाला प्रचार मोहीम सुरू करायाची आहे. पोस्टर लावायचे आहेत. आमचे सर्व स्त्रोत बंद करण्यात आलेत. मग ही कशी निवडणूक होत आहे? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

नेत्यांना धमकावले जात आहे, पैसे देऊन सरकारे पाडली जात आहेत. नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. अरविंद केजरीवाल, सोरेन यांना तुरुंगात टाकले आहे. ही मॅच फिक्सिंग केली जात आहे. हे फक्त मोदी करत नाहीयेत, तर त्यांच्यासोबत देशातील ३-४ अब्जाधीश देखील आहेत. या मॅच फिक्सिंगचं एकच लक्ष आहे, यामधून देशाचं संविधान गरीबांच्या हातातून हिसकावून घेण्याचा डाव आहे.

ज्या दिवशी हे संविधान संपेल त्या दिवशी हा हिंदुस्तान वाचणार नाही. हा पोलीस किंवा धमक्या वापरून चालवले जाऊ शकत नाही, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. संविधान संपेल त्या दिवशी देश देखील वाचणार नाही, वेगवेगळी राज्य होऊन जातील देश वाचणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT