Rahul-Gandhi 
देश

ट्विटर पक्षपाती प्लॅटफॉर्म, राहुल गांधींचा हल्लाबोल

त्यांनी टि्वटरच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. टि्वटर देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असून लोकशाही रचनेवर आघात करतय.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: काँग्रेस (congress) नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी शुक्रवारी टि्वटरवर हल्लाबोल केला. त्यांनी टि्वटरच्या तटस्थतेवर (Twitter neutral) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. टि्वटर पक्षपाती प्लॅटफॉर्म आहे. जे सरकार (govt) सांगतं, तेच टि्वटर ऐकतं, असा आरोप त्यांनी केला. टि्वटर देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असून लोकशाही रचनेवर आघात करत असल्याचा त्यांनी आरोप केला.

भारतीय लोकशाहीवर हल्ला झाला असल्याच्या आपल्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. संसदेमध्ये आम्हाला बोलू दिले जात नाहीय. प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवले जातेय असे राहुल यांनी युटयूब वरच्या १.३४ मिनिटाच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. टि्वटरवरुन मत मांडता यायचे, त्यामुळे तो आशेचा एक किरण होता. पण आता असे राहिलेले नाही. टि्वटर तटस्थ व्यासपीठ राहिलेले नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टि्वटरने सध्या ५ हजार अकाऊंट लॉक केली आहेत. यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा अधिकृत अकाऊंटस आहेत. दिल्लीतल्या अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. त्याचे फोटो शेअर केले म्हणून टि्वटरकडून ही कारवाई करण्यात आलीय. राहुल गांधी यांचे अकाऊंट शनिवारी याच कारणासाठी बंद करण्यात आले होते. अकाऊंट लॉक करणं हा फक्त माझ्या एकट्यावरचा हल्ला नाही. पण दोन कोटी फॉलोअर्सवरचा हा हल्ला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT