Rahul Gandhi Speech In Lok Sabha Mansoon Session. Esakal
देश

Rahul Gandhi Speech: "हिंदू, आरएसएस, मोदी, भाजप..." राहुल यांच्या भाषणाचे अनेक भाग लोकसभेच्या रेकॉर्डवरून हटवले

Lok Sabha Mansoon Session: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू मणिपूर, एनईईटी, शेतकरी, अग्निवीर आणि आरएसएस यासह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.

आशुतोष मसगौंडे

सध्या 18 व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू असून, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणानंतर सोमवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू मणिपूर, नीट परीक्षा, शेतकरी, अग्निवीर आणि आरएसएस यासह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री आणि पाच मंत्र्यांनी उभे राहून राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेतला.

यानंतर आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत दिलेल्या भाषणातील अनेक भाग काढून टाकण्यात आले आहेत. हटवलेल्या भागांमध्ये त्यांनी हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-भाजप-आरएसएस, इतरांबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा समावेश आहे.

राहुल गांधी भाषणात काय म्हणाले?

भगवान शिव, गुरु नानक आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे धरून त्यांनी निर्भयतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन धर्माचा राहुल यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात संदर्भ दिला. त्यांनी भगवान शिवाचे गुणधर्म, गुरू नानक, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि महावीर यांच्या शिकवणीचाही उल्लेख केला आणि म्हणाले सर्व धर्म आणि महान लोक म्हणतात, "डरो मात, डराओ मत."

यावेळी राहुल यांनी कुराण निर्भयतेबद्दल बोलते हे अधोरेखित करण्यासाठी गांधींनी प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख केला.

राहुल गांधींच्या या वक्तव्यांमुळे सभागृहात गदारोळ माजला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल यांचे भाषण रेकॉर्डवरून हटवण्याची मागणी केली होते.

गांधींनी संसदेच्या कामकाजातून काढून टाकलेली विधानांमध्ये, भाजपवर केलेले आरोप, भाजप अल्पसंख्याकांना अन्यायकारक वागणूक देत आहे, उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यावर केलेली टिप्पणी, NEET परीक्षा श्रीमंतांसाठी आहे आणि त्यात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणतेही स्थान नाही, अग्निवीर योजना ही भारतीय लष्कराची नाही, तर पंतप्रधान कार्यालयाची आहे, याचा समावेश आहे.

राहुल गांधी बोलत असताना त्यांच्या भाजप सदस्य उभे राहताच, गांधींनी भाजपला फटकारले, "आप हिंदू हो ही नही". हिंदू धर्मात हे स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्याने सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि सत्यापासून मागे हटू नये किंवा घाबरू नये.”

आपले भाषण संपवताना, गांधींनी सत्ताधारी पक्षाला भीती किंवा द्वेष पसरवू नका असे अवाहन केले. ते म्हणाले, "विरोधकांना तुमचे शत्रू समजू नका. तुम्हाला हवी ती चर्चा करायला आम्ही तयार आहोत. देशाला पुढे नेण्यासाठी एकत्र काम करूया."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT