Rahul Gandhi statement RSS is spreading fear hatred violence Demonetisation GST sakal
देश

आरएसएस पसरवतोय भीती, द्वेश, हिंसा; राहुल गांधी 

राहुल गांधी; निवडत उद्योजकांसाठी नोटाबंदी, जीएसटी

- अतुल पाटील, विकास देशमुख

माळहिवरा (जि.हिंगोली) : ‘‘पहिल्यांदा भीती पसरवून द्वेष वाढवायचा. द्वेष वाढला की हिंसा वाढवायची हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपचा कार्यक्रम आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केली. भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या कोपरा सभेत राहुल गांधी यांनी महागाई, अग्निवीर, उद्योजकांची कर्जमाफी, बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी यावरून मोदी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून हटवून ते जात, धर्म यावर न्यायचे. त्यातून त्यांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देता त्यांच्या मनातही भीती निर्माण केली जाते.

काहीही पिकवले तरी त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या खिशातून हजारो कोटी रुपये काढून खासगी विमा कंपनीला दिले जातात. नुकसान झाले की विमा रक्कम दिली जात नाही. पीक चांगले येते तेव्हा निर्यात बंद करून आयात केली जाते. अब्जाधीशांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते पण, शेतकऱ्यांचे केले जात नाही, ही शोकांतिका आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले. हा पैसा दोन-तीन उद्योजकांकडेच जात आहे. या उद्योजकांसाठी नोटाबंदी केली, जीएसटी आणला. त्यामुळे लघू उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.

मोबाईल फोन ‘मेड इन हिंगोली’
सध्या आपण वापरत असलेल्या मोबाईल फोनमधील सुटे भाग ‘मेड इन चायना’ आहेत. आपले दोन उद्योजक ते विकत आहेत. फोन आणि इतर वस्तू ‘मेड इन इंडिया’च नव्हे तर ‘मेड इन हिंगोली’, ‘मेड इन लातूर’, ‘मेड इन औरंगाबाद’ व्हाव्यात, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT