rahul gandhi farmers 
देश

शेतकरी आंदोलन: आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू; राहुल गांधींनी व्यक्त केला पाठिंबा

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सुधारित तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संतप्त आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन उभारुन देखील मोदी सरकारने हे कायदे मागे घेतलेले नाहीयेत. हे कायदे काळे असून याचा शेतकऱ्यांना फायदा न होता भांडवलदारांनाच होणार असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. म्हणूनच, नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

या कायद्यांवरुन आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र तरिही समाधानकारक असा तोडगा निघाला नाहीये. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली. मात्र, हे आंदोलन आजही सुरुच आहे. हे आंदोलन आणखी किती दिवस सुरु राहणार, याबाबत काहीच स्पष्टता नाहीये. उन, पाऊस, थंडी, वारा आणि कोरोना अशा सगळ्या संकटात हे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठामपणे उभे राहिले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत अनेक आंदोलकांनी आपला जीव गमावला आहे.

शेतकरी आंदोलनाचे सहा महिने पूर्ण करणं तितकसं सोपं नव्हतं. मोदी सरकारच्या अहंकारी आणि निर्दयी वागणुकीमुळे या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे आंदोलक शेतकरी आपला होऊपर्यंत ठामपणे उभे राहितील. #500DeathsAtFarmersProtest अशा आशयाचे ट्विट किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.

याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून सरकारविरोधातील शेतकऱ्यांच्या या मागणीला कृतीशील पाठिंबा दाखवला आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात. याच संदर्भात आता राहुल गांधी यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, शेती आणि देशाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आपले प्राण गमावले आहेत. मात्र, शेतकरी घाबरले नाहीयेत. ते आजही तितक्याच ठामपणे खरेपणाने उभे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT