Amar Jawan Jyoti - Rahul Gandhi Team eSakal
देश

राहुल गांधींच्या हस्ते होणार 'अमर जवान ज्योती'चं भूमिपूजन!

सरकारकडून इतिहास पुसण्याचं काम सुरु असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात अमर जवान ज्योतीचं भूमिपूजन केलं जाणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी छत्तीसगडमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी याची घोषणा केली. (Rahul Gandhi to lay foundation stone of Amar Jawan Jyoti next week)

बघेल यांनी म्हटलं की, "आपल्या शहिदांची वीरकथा आपल्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशासाठी कुठलंही योगदान नसलेल्यांना हे सर्व कळणार नाही. त्यामुळंच राहुल गांधी यांच्याहस्ते ३ फेब्रुवारी रोजी "अमर जवान ज्योती'चं भूमिपूजन केलं जाणार आहे. भारतमातेच्या सुपुत्रांना हीच खरी श्रद्धांजली असेल. जय हिंद"

दिल्लीतील इंडिया गेट येथील 'अमर जवान ज्योती'चं राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनिकरण करण्यात आलं. यावरुन काँग्रेससह विरोधी पक्षांनी विविध केंद्रावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसनं भाजपवर टीका करताना म्हटलं होतं की, सरकारकडून इतिहास पुसण्याचं काम सुरु आहे. काही लोकांना देशभक्ती आणि बलिदानाचं महत्व कळूच शकत नाही. तसेच अमर जवान ज्योती पुन्हा प्रज्वलित करण्यात येईल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT