RahulGandhi 
देश

'न्यू इंडिया'मुळे राहुल वादाच्या भोवऱ्यात

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाची खिल्ली उडवताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) ट्‌विट केलेल्या 'न्यू इंडिया' या उपहासात्मक फोटो ओळीमुळे ते सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या चौफेर हल्ल्यात सापडले आहेत.

भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या एकूणच मानसिकतेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 'न्यू इंडिया' ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताजी घोषणा असली, तरी 'प्रधानसेवक', 'प्रथमसेवक' या संकल्पनेप्रमाणेच नवभारताच्या कल्पनेचेही मूळ पंडित नेहरू यांच्याच एका ऐतिहासिक भाषणात आहे.

संसदेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मोबाईलवर दंग असल्याचे दिसल्यावर राहुल गांधींवर भाजपने चौफेर हल्ला चढविला होता. त्यापाठोपाठ आज राहुल यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून लष्कराचे जवान आणि त्यांच्या श्वान पथकाचा योग करतानाचा एक फोटो ट्‌विट केला गेला व त्याला "न्यू इंडिया' असे शीर्षक दिले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामधून कॉंग्रेस अद्याप सावरलेला नाही, त्यात आता राहुल गांधींच्या ताज्या कृतींमुळे भाजपच्या हाती ते नवनवीन कोलीत देत आहेत.

शहा यांनी ताज्या प्रसंगाबाबत म्हटले आहे, की कॉंग्रेस संपूर्ण नकारात्मकतेच्या भूमिकेत उभा आहे. त्यांनी आज तोंडी तलाकच्या मध्ययुगीन प्रथेचे जाहीर समर्थन केले व आता योग दिनाची चेष्टा करताना लष्कराला अपमानित केले. हा पक्ष सकारात्मकतेच्या मार्गावर पुढे जाईल व कठोर आव्हानांवर विजय मिळवून समोर येईल ही आशा आहे. राजनाथसिंह यांनीही राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना म्हटले आहे, की देशाच्या सुरक्षेत योगदान देणाऱ्या सैन्याचा कोणी वारंवार अपमान करतो, तेव्हा "परमेश्‍वरा, यांना सुबुद्धी दे' इतकीच प्रार्थना केली जाऊ शकते. 

त्यांनी पराभवातून अजूनही धडा घेतलेला नाही. त्यांनी एका फटक्‍यात भारतीय लष्कर, शूर जवान, श्वान पथक, योग परंपरा आणि देशाचा अपमान केला आहे. 
- तेजस्वी सूर्या, भाजप खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT