Rahul Gandhi tweeted for PM Modi mother Heeraben Modi said I am with the PM in difficult times  
देश

Rahul Gandhi Tweet : PM मोदींसाठी राहुल गांधीचं भावनिक ट्वीट; म्हणाले, या खडतर प्रसंगी…

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, पण यावेळेस याच्या अगदीच उलट घडतांना दिसतं आहे. राहुल गांधींनी चक्क मोदींच्या बाजूने असल्याच सांगत त्यांना धीर दिला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आई श्रीमती हिराबेन मोदी यांची बुधवारी तब्बेत बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या ‘यू एन मेहता इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर’ इथे अॅडमिट केलं गेलेल आहे.

18 जूनला प्रधानमंत्री मोदींनी आपल्या आईचा 100 वा वाढदिवससुद्धा साजरा केलेला; आणि या संदर्भात त्यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा केली होती.

नक्की काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी 28 डिसेंबरला दुपारी 3 च्या सुमारास हे ट्वीट केलं, त्यात ते म्हणाले की, “एका आईच आणि मुलाचं नात हे खूप अनमोल असतं, मोदीजी या खडतर प्रसंगात मी तुमच्या बरोबर आहे, तुमची आई लवकर बरी होवो यासाठी मी प्रार्थना करतो ”

प्रियंका गांधी आणि इतर लोकांनीही केलं ट्वीट

राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या आईसाठी ट्विट केल आहे. त्यांनी लिहिल की, पंतप्रधान मोदींच्या आईची तब्येत खराब असल्याची बातमी कळली, या परिस्थितीत आम्ही सारेच त्यांच्यासोबत आहोत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.

याच बरोबरीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही ट्वीट केले की, पंतप्रधानांच्या पूज्य आईच्या आजारपणाची बातमी मिळाली आहे, आम्ही सर्वजण त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतो आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी; AQI 375 वर पोहोचला

नवऱ्याच्या अफेअरची कुणकुण; पत्नीकडून हॉटेल रूममध्ये रंगेहात पकडले गेलेले कमल हासन; अभिनेत्रीचं नाव ऐकून बसेल धक्का

Maharashtra Biodiversity : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत भर; दख्खन पठारावर प्रथमच दुर्मीळ पतंगांची नोंद, विदर्भातील संशोधकांच्या प्रयत्नांना यश

हवाला मार्गे कोलकाताहून I-PAC च्या गोवा कार्यालयात पोहोचले 20 कोटी, ईडीचा खळबळजनक दावा!

Maharashtra Cold Wave : राज्यात तापमानाचा पारा घसरला; गारठा कायम राहणार ? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान...

SCROLL FOR NEXT