Rahul Gandhi - himanta biswa sarma 
देश

वाद पेटला! राहुल गांधींना आसामच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा; म्हणाले, आता कोर्टात भेटू

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत आहेत. शनिवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विट करून गौतम अदानींवर निशाणा साधला. पण त्याचबरोबर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यावर स्पष्ट शब्दात 'अदानी' लिहिले होते. पण त्यासोबतच काँग्रेसच्या पाच माजी नेत्यांची नावे त्यात होती.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोवर गुलाम, सिंधिया, किरण, हिमंत आणि अनिल असे लिहिले होते. हे पाचही नेते आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र यातील चौघांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुलाम नबी आझाद यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. राहुल गांधी यांनी हा फोटो ट्विट करत लिहिले की, "सत्य लपवतात, म्हणून दररोज भटकवतात. पण प्रश्न एकच आहे - अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये कोणाचे?

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत आपलं नाव पाहून हिमंत बिस्वा शर्मा संतापले. बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील रक्कम तुम्ही कुठे लपवली, हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही. तसेच, तुम्ही ओटावियो क्वात्रोचीला अनेकवेळा भारतीय न्यायव्यवस्थेच्या तावडीतून कसे सुटू दिले? हेही विचारलं नाही. पण आता आपण कोर्टात भेटू, असा सूचक इशाराही शर्मा यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT