Sharad Pawar On Rahul Gandhi  esakal
देश

Rahul Gandhi Savarkar Row: शरद पवारांनी राहुल गांधींचे टोचले कानं, म्हणाले...

सावरकरांचा मुद्दा काँग्रेस वगळणार?

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत,' असं वक्तव्य केलं. त्यानंतर देशासह राज्यभरात चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rahul Gandhi Veer Savarkar row Sharad pawar reaction maharashtra politics )

विरोधकांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडली आहे. 'सावरकर आणि आरएसस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही.

सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुदद्दे आपल्या समोर आहेत. यावर चर्चा व्हावी.' पवारांच्या या मुद्याचे खासदारांनीही समर्थन केलं.

त्यानंतर राहुल गांधी यांनीही पवारांच्या मताचा मी आदर करतो असं बैठकीत म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरिता विरोधी पक्षांची एक बैठक काल दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी तसेच शरद पवार यासोबत अन्य समाजवादी, जेडीयु खासदार उपस्थित होते.

त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते आता सावरकर यांच्या मुद्द्याला बगल देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आलेले राहुल माफी मागण्याच्या मुद्द्यावर म्हणाले, ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Eknath Shinde : 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ‘पोटदुखी’ होणाऱ्यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

E-Vehicle: 'ई-वाहन' खरेदीदारांना सीएम योगींची मोठी भेट; नोंदणी आणि रोड टॅक्समध्ये दोन वर्षांची वाढीव सूट!

Trupti Desai: सासपडेतील संशयिताचा एन्काउंटर करा: तृप्ती देसाई; पीडित कुटुंबीयांचे सांत्वन, कायद्याचा धाक उरलेला नाही

Maharashtra Flood Relief : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन हजार कोटी, मंत्री मकरंद पाटील; २३ जिल्ह्यांतील ३३ लाख शेतकऱ्यांना मदत

Madhya Pradesh : मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी केले ओरछामध्ये श्रीराम राजा दरबारचे भूमिपूजन; ओरछातील विकासकामांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT