rahulgandhi_50.jpg
rahulgandhi_50.jpg 
देश

अर्थव्यवस्था आणि रोजगारप्रकरणी आणखी वाईट बातम्या येतील; राहुल गांधींचा इशारा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसचे (congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी अर्थव्यवस्थेच्या खराब परिस्थितीवरुन केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आरबीआयच्या ग्राहक विश्वास अहवालाचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले आहेत की, अर्थव्यवस्था आणि रोजगारप्रकरणी आणखी वाईट बातम्या येऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी ग्राहक विश्वास अहवाल (Consumer confidence survey) जाहीर केला होता. यानुसार  ग्राहक विश्वासात घसरण होऊन आतापर्यंतच्या सर्वात खालची पातळी गाठली गेली आहे. 

कोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा

राहुल गांधी यांनी ग्राहक विश्वास निर्देशांकाचा ग्राफ ट्विटरवर शेअर केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाच्या मूडचा खुलासा केला आहे. लोकांचा विश्वास आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. शिवाय भीती आणि असुरक्षा आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. अर्थव्यवस्था आणि रोजगारप्रकरणी आणखी वाईट बातम्या येण्याची शक्यता आहे, असं राहुल गाधी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या ग्राहक विश्वास अहवालानुसार जूलै 2020 मध्ये ग्राहक विश्वास निर्देशांक 53.8 वर पोहोचला आहे. ही आजपर्यंतची सर्वात खालची पातळी आहे. असे असले तरी भविष्य अपेक्षा निर्देशांक (Future expectations index) जूलै महिन्यात सुधारुन 105.4 वर पोहोचला आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या २० दिवसांत दहा लाखावरून दुप्पट २० लाख झाली आहे. या रुग्णसंख्या वाढीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य करताना "२० लाखाचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार”, असा टोला लगावला आहे. 

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

देशात मागील २४ तासात ६२,५३८ नवे रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या २०,२७,०७५ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यात ६,०७,३८४ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ४१,५८५ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधींनी "२० लाखाचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार”, असे खोचक ट्विट केले. याआधी १७ जुलैला दहा लाख रुग्ण संख्या झाल्यानंतर राहुल गांधींनी इशारा दिला होता, की या वेगाने कोरोना पसरत राहीला तर १० ऑगस्टपर्यंत २० लाख रुग्ण होतील. त्यामुळे ही महामारी रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आव्हानही त्यांनी केले होते. दरम्यान, आतापर्यंत एकूण २,२७,२४,१३४ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ५,७४,७८३ चाचण्या काल झाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT