Rahul Gandhi T Shirt Esakal
देश

Rahul Gandhi T Shirt: विरोधी पक्षनेते होताच राहुल गांधी पांढऱ्या टी-शर्टवरून कुर्त्यावर का? अखेर कारण समोर

LoP Rahul Gandhi: सप्टेंबर 2022 मध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4,080 किमीची भारत जोडो यात्रा केली. याच काळात त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टची सर्वाधिक चर्चा झाली.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे खास ड्रेसमध्ये दिसत आहेत. त्या हा ड्रेस दुसरा तिसरा काही नसून पांढरा टी-शर्ट आणि पॅन्ट असा आहे. मात्र बुधवारी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर बऱ्याच काळाने राहुल गांधी पांढऱ्या टी-शर्टऐवजी कुर्त्यामध्ये दिसले.

दरम्यान राहुल गांधींच्या बदललेल्या पोशाखावरून काँग्रेस आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. राहुल गांधी पांढरा टी-शर्ट पारदर्शकता, दृढनिश्चय आणि साधेपणाचे प्रतिक असल्याचे म्हणायचे मग विरोधी पक्षनेते होताच ते टी-शर्टवरून कुर्त्यावर का आले?

राहुल गांधी टी-शर्टवरून कुर्त्यावर का?

भारत जोडो यात्रा असो, भारत न्याय यात्रा असो, निवडणूक रॅली असो अथवा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सभा प्रत्येकी ठिकाणी राहुल गांधी पाढऱ्या टी-शर्टमध्ये दिसायचे. गेल्या काही वर्षांत या सर्व कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी केवळ पांढऱ्या टी-शर्टमध्येच दिसत असत. मात्र राहुल गांधींनी बराच काळ परिधान केलेला पोशाख बुधवारी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होताच बदलला.

बऱ्याच दिवसांनंतर ते पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसले. विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी हा टी-शर्ट काढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राहुल गांधींच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, राहुल यांचा पांढरा कुर्ता-पायजमा हा पोशाख सामान्य नेत्यांसारखा जास्त काळ दिसणार नाही. राहुल गांधींनी बुधवारी केवळ संदेश देण्यासाठी कुर्ता परिधान केल्याचे बोलले जात आहे.

भारत जोडो यात्रेत चर्चेत आला टी-शर्ट

19 जून 1970 रोजी जन्मलेले, राहुल गांधी हे पाच वेळा लोकसभेचे खासदार होते ज्यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पहिली निवडणूक जिंकली.

सप्टेंबर 2022 मध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4,080 किमीची भारत जोडो यात्रा केली. याच काळात त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टची सर्वाधिक चर्चा झाली.

राहुल गांधी का घालतात पांढरा टी-शर्ट?

राहुल गांधी नेहमी पांढरा टी-शर्ट का घालतात यामागचे कारण काही दिवसांपूर्वी त्यांनीच सांगितले होते. ते म्हणाले होते की, "मी कपड्यांबद्दल फारसा विचार करत नसलो तरी पाढरा टी-शर्ट "पारदर्शकता" आणि "साधेपणा" दर्शवतो. काँग्रेसने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, “मी साधे राहणे पसंत करतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT