Rahul Gandhi 
देश

INDIA vs Modi : राहुल गांधी धाडसी नेते, तेच विरोधकांचा चेहरा असतील; 'या' खासदाराचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक लढविणे अशक्यप्राय झाले होते. तसेच त्यांची खासदारकी देखील रद्द झाली होती. मात्र आता त्यांची खासदारकी परत मिळून आगामी निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसच्या एका खासदाराने आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच २६ विरोधी पक्षांनी मिळवून इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. या आघाडीत सामील होतानाच काँग्रेसने आमचा पक्ष पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय राहुल गांधी यांच्या निवडणूक लढविण्यावर शंका होती. मात्र आता त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच आगामी बैठकांमध्ये विरोधकांच्या आघाडीचा चेहरा निश्चित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत आता राहुल गांधी यांचं नाव येणार हे निश्चित आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी राहुल गांधी हे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा चेहरा असतील असं म्हटले आहे. तसेच राहुल गांधी हे एक धाडसी नेते आहेत, ज्यांनी नेहमीच मोदी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. भाजपने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दिलासा दिल्याचं ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच नवा राजकीय अध्याय लिहिला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते विरोधी पक्षाचा चेहरा असतील, यात शंका नाही, असही भट्टाचार्य म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT