Rahul slams Modi over tainted leaders
Rahul slams Modi over tainted leaders 
देश

मोदीजी, तुम्ही बोलता खूप करत काहीच नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था

बंगळूर - "मोदीजी तुम्ही बोलता खूप मात्र करत काहीच नाही, भ्रष्टाचारी रेड्डी बंधुंना भारतीय जनता पक्षाने 8 तिकिटे दिली आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 मिनीटे बोलून दाखवावे", असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केला. याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना हातात कागद न घेता 15 मिनिटे बोलून दाखवण्याचे आव्हान केले होते. आता याउलट राहुल गांधींनी काही ठराविक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना बोलण्याचे आव्हान केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना तिकिटे दिली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच भ्रष्टाचारी रेड्डी बंधूना तिकीटे देण्याबरोबरच 23 खटले असणारे येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. कर्नाटकच्या महत्वाच्या 11 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यावर मोदी काही बोलणार आहेत का, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला. याबाबत ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

राफेल करार, नीरव मोदी या विषयावर मोदी संसदेत 5 मिनिटेसुद्धा बोलू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे राहुल गांधी यांनी 5 वेळा बोलून दाखवावे असे म्हणून याआधी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT