Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

ज्येष्ठ नेते पुत्रप्रेम पाहत बसले अन् इकडे पक्षाची...: राहुल गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.   

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या काँग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींकडे सोपविणारा ठरावही कार्यकारिणीने संमत केला आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांकडे बोट केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलांनी निवडणूक लढविली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल अतिशय संतापले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुलांनाच तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकला होता. काँग्रेस नेते ज्योतिराजदित्य सिंधिया यांनी पक्षाने स्थानिक नेत्यांना तयार करायला हवे असे वक्तव्य केल्यानंतर राहुल यांनी हा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर नरमाईची भूमिका घेतली. काँग्रेसने हाती घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे राहुल म्हणाले.

...तर राहुल गांधी भाजपच्या जाळ्यात फसतील : प्रियांका
राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास ते भाजपच्या जाळ्यात फसतील असे म्हणत प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. इतर सर्वच नेत्यांनी राहुल यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती राहुल यांना केली. राहुल यांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्ते आत्महत्या करण्याची शक्यता असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT