NewsClick Raid Esakal
देश

NewsClick Raid: न्यूजक्लिक न्यूजपोर्टलमधील पत्रकारांच्या घरावर छापा, चिनी फंडिंगच्या आरोपांची चौकशी सुरू

चिनी फंडिंगच्या आरोपांनी घेरलेल्या न्यूज क्लिक या न्यूजपोर्टलवर आज(मंगळवारी) सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

चिनी फंडिंगच्या आरोपांनी घेरलेल्या न्यूज क्लिक या न्यूजपोर्टलवर आज(मंगळवारी) सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त आहे. ऑगस्टमध्येच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता.(Latest Marathi News)

मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. न्यूजपोर्टलला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर जवळपास 38 कोटींच फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला आहे. (Marathi Tajya Batmya)

दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाची धाड पडली आहे. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मींच्या घरी धाड टाकण्यात येत आहे.

लॅपटॉप जप्त

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे.(Latest Marathi News)

चीन कनेक्शन

काही दिवसांपुर्वी, अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की, न्यूज क्लिक या जागतिक नेटवर्कचा भाग आहे ज्याला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघमकडून निधी मिळतो. विशेष म्हणजे सिंघम कथितरित्या चिनी मीडियासोबत जवळून काम करतो. ईडीने सप्टेंबर 2021 मध्ये पुरकायस्थ यांच्याशी संबधित काही ठिकाणांवरही छापे टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT