Railway Affected By Rain, Maharashtra Rain And Weather Updates Esakal
देश

Railway Affected By Rain: महाराष्ट्रासह 20 राज्यांना पाऊस झोडपणार; 99 रेल्वे रद्द, मुंबईतून 'ही' एक्सप्रेस धावणार नाही, ट्रॅकही गेला वाहून

Maharashtra Rain And Weather Updates: रेल्वे ट्रॅक वाहून गेल्यामुळे दिल्ली-विजयवाडा मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 99 गाड्या रद्द केल्या असून 54 गाड्या वळवल्या आहेत. (Railway Affected By Rain)

आशुतोष मसगौंडे

हवामान विभागाने (IMD) आज 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील मणिपूर, आसाम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.

यापूर्वी, गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये विध्वंस केला आहे. तेलंगणात नऊ जणांचा मृत्यू झाला. समुद्रम ते महबूबाबाद दरम्यानचा रेल्वे ट्रॅक वाहून गेला. त्यामुळे दिल्ली-विजयवाडा मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 99 गाड्या रद्द केल्या असून 54 गाड्या वळवल्या आहेत.

99 गाड्या रद्द

दक्षिण मध्य रेल्वेने रविवारी एकूण 99 गाड्या रद्द केल्या आणि 54 गाड्या वळवल्या आहेत. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत त्यामध्ये दानापूर-बेंगलोर, निजामुद्दीन-कन्याकुमारी, सीएसटी मुंबई-भुवनेश्वर आणि तांबरम-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. तेलंगणामध्ये सोमवारी सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईलही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT