Passengers carrying luggage at a railway station as Indian Railways implements airline-style baggage rules for train travel.

 

esakal

देश

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

 Train Passenger Baggage Policy : जाणून घ्या, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीच्या कंपार्टमेंटची काय आहे परिस्थिती?

Mayur Ratnaparkhe

New Railway Luggage Rules for Passengers : विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वे प्रवासासाठी सामानाचे नियम अधिक कठोर होणार आहेत. कारण, आता, रेल्वेने स्पष्ट केले आहे की रेल्वे प्रवासादरम्यान निर्धारित सामान मर्यादा ओलांडल्याबद्दल प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की प्रवाशांना त्यांच्या क्लासनुसार आधीच फ्री बॅगेज अलाउन्स निश्चित आहे आणि त्यापेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी शुल्क द्यावे लागते.

ट्रेनमध्ये सेकंड क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३५ किलो पर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सामान नेणारे प्रवासी फारतर ७० किलो पर्यंत नेऊ शकतात,  परंतु यासाठी त्यांना निश्चित करण्यात आलेले शुल्क द्यावे लागतील.

स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी फ्री अलाउन्स थोडा जास्त आहे.  ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ४० किलोपर्यंत सामान नेऊ शकतात. आवश्यक असल्यास, ८० किलो पर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे, परंतु यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

तर विमान कंपन्यांच्या बाबतीत, फ्री बॅगेज अलाउन्स एअरलाइन आणि उड्डाण मार्गानुसार बदलतो. साधारणपणे, देशांतर्गत विमान उड्डाणांमध्ये १५ किलो पर्यंत चेक-इन केलेले सामान आणि ७ किलो वजनाची हँडबॅग मोफत ठेवता येते, तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये २३ ते २५ किलो किंवा दोन प्रत्येकी २३ किलो वजनाच्या बॅगा मोफत नेण्याची परवानगी असते. रेल्वे नियमांनुसार, प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवास वर्गानुसार विशिष्ट प्रमाणात मोफत सामान नेण्याची परवानगी आहे. शिवाय, शुल्क भरून जादा सामान नेण्यास कमाल मर्यादा आहे. मात्र, यापेक्षा जास्त सामान वाहून नेणे नियमांचे उल्लंघन मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT