Railway Minister Ashwini Vaishnaw Journey  esakal
देश

Ashwini Vaishnaw: वाजपेयींचे सचिव ते मोदींचे खास मंत्री, जाणून घ्या IAS ऑफिसरचा रेल्वेमंत्री बनण्याचा प्रवास

Ashwini Vaishnaw Lifestory: 2014 मध्ये एनडीए सरकारचे चौथे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नरेंद्र मोदींचा विश्वास जिंकलाय

साक्षी राऊत

Railway Minister Journey : ओडिसा कॅडरचे माजी आयएएस अश्विनी वैष्णव यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आणि सध्याच्या मंत्रिमंडळात रेल्वे आणि दळणवळण यासारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत.

2014 मध्ये एनडीए सरकारचे चौथे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नरेंद्र मोदींचा विश्वास जिंकलाय. वैष्णव याआधी अटलबिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिवही राहिले आहेत.

जोधपूरमध्ये राजस्थान येथे जन्मलेल्या अश्विनी वैष्णव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत आणि 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते अखिल भारतीय स्तरावर 27 व्या क्रमांकावर होते.

यानंतर त्यांनी ओडिसाच्या बालासोर आणि कटक जिल्ह्याचे डीएम म्हणून काम केले. 1999 मध्ये आलेल्या भीषण चक्रीवादळात त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून आपल्या कौशल्याची ओळख करून दिली आणि त्यांच्या माहितीच्या आधारे सरकार जलद पावले उचलू शकले, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

मात्र २००८ मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि अमेरिकेच्या विश्वविद्यालयात MBA चा अभ्यास करण्यासाठी निघाले. MBA केल्यानंतर त्यांनी काही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. आणि त्यानंतर गुजरातमध्ये ऑटो अॅक्सेसरीजचे उत्पादन युनिट सुरू केले.

28 जून 2019 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस आधी वैष्णव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर वैष्णव यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवून लोकांना आश्चर्यचकित केले होते. (Narendra Modi)

एनडीएने केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर 2014 मध्ये डीव्ही सदानंद गौडा रेल्वेमंत्री झाले. गौडा रेल्वेमंत्री असताना गोरखधाम एक्स्प्रेसची एका थांबलेल्या मालगाडीला धडक बसून अपघात झाला.

या अपघातात सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला. 9 नोव्हेंबर 2014 रोजी सुरेश प्रभू एनडीए सरकारचे दुसरे रेल्वे मंत्री बनले. प्रभू यांच्या कार्यकाळात तीन मोठे रेल्वे अपघात झाले.

सप्टेंबर 2017 मध्ये सुरेश प्रभू यांच्या जागी पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री बनवण्यात आले. गोयल जुलै 2021 पर्यंत रेल्वे मंत्री राहिले आणि त्यांच्या कार्यकाळात एकही मोठा अपघात झाला नाही. यानंतर जुलै 2021 पासून रेल्वे मंत्रालयाची कमान अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT