Vande Bharat Railway sakal
देश

Railway: वीस डब्यांची पहिली ‘वंदे भारत’ सज्ज, मुंबई - अहमदाबाद प्रवास पाच तासांत पूर्ण!

Latest Railway News: दुपारी एक वाजता गाडीने मुंबई सेंट्रल ते अहमदाबादकडे परतीचा प्रवास सुरू केला

सकाळ डिजिटल टीम

Latest Maharashtra News : देशातील पहिली २० डब्याची वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या मार्गावर शुक्रवारी (ता.९) या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वंदे भारत रेल्वेने  १३० किलोमीटर ताशी वेगाने अहमदाबाद ते मुंबई सेंट्रलचे अंतर पाच तास २१ मिनिटांत पार केले.

मुंबई ते अहमदाबाद हा सर्वात व्यग्र रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ५० हून अधिक रेल्वे गाड्या धावतात. ज्यामध्ये वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या गाड्यांचा समावेश आहे.

तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३८ ते १५६ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. सध्या १६ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी २० डब्यांची ‘वंदे भारत’ चालविण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार देशातील पहिली २० डब्यांची वंदे भारत गाडीची चाचणी घेण्यात आली. ही २० डब्याची गाडी शुक्रवारी (ता. ९) अहमदाबादहून सकाळी ७ वाजता रवाना झाली. ती दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचली. त्यानंतर दुपारी एक वाजता गाडीने मुंबई सेंट्रल ते अहमदाबादकडे परतीचा प्रवास सुरू केला. या गाडीची चाचणी ताशी १३०किलोमीटर वेगाने घेण्यात आली.

वंदे भारत रेल्वेची ताशी तब्बल १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे; मात्र वेगानुसार रुळांची क्षमता नसल्याने ‘वंदे भारत’ची गती ११० ते १३० किलोमीटर ताशी ठेवण्यात येते. त्यामुळे भारतीय रेल्वेने या गाड्यांचा वेग दुप्पट करणे आणि सरासरी वेगात २५ किमी प्रतितासाने वाढ करण्यासाठी ‘मिशन रफ्तार’ची आखणी केली आहे. यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई ते दिल्ली १, ३७९.१४ किमीचा मार्ग निवडला आहे. मुंबई-सुरत-बडोदा - दिल्ली त्याचबरोबर मुंबई- बडोदा- अहमदाबाद या लोहमार्गाचे अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT