Railways issues notices to 2 Delhi mosques bengali market masjid and takia babbar shah  
देश

Indian Railways : दोन बड्या मशिदींना रेल्वे प्रशासनाची नोटीस; १५ दिवसांत हटवा, अन्यथा…

रोहित कणसे

रेल्वेने दिल्लीतील दोन मोठ्या मशिदींना नोटीस बजवाली आहे. दिल्लीतील बंगाली मार्केट आणि आयटीओ येथील ताकिया बब्बर शाह या मशिदींना नोटीस पाठवण्यात आली आहे. रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये दोन्ही मशिदीच्या प्रशासनाला १५ दिवसात अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा अॅक्शन घेण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

रेल्वेने जारी केलेल्या नोटीशीमध्ये १५ दिवसांत अतिक्रमण काढा अन्यथा आम्ही येऊन काढू असे म्हटले आहे. तसेच या नोटीसीनंतर मशिद कमिटीने हे मशिद शेकडो वर्ष जुनी असल्याचा दावा केला आहे, तर रेल्वेने इमारत त्यांच्या जागेवर बनवल्याचे म्हटले आहे.

उत्तर रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी केली असून त्यामध्ये रेल्वेची जमीनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आल आहे. तुम्ही अनाधिकृत रेल्वेच्या जमीनीवर बांधलेली इमारत/ मंदिर/ मशिद/मजार नोटीस दिल्याच्या १५ दिवसात स्वेच्छेने काढून टाकावी, अन्यथा रेल्वे प्रशासन अॅक्शन घेईल. रेल्वे अधिनियम अनुसार अनाधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात येईल. या प्रक्रियेत होणाऱ्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार असतील, यासाठी रल्वे प्रशासन जबाबदार नसेल.

मशिद ताकिया बब्बर शाह चे सेक्रेटरी अब्दुल गफ्फार यांच्या नुसार ही मशिद तब्बल ४०० वर्ष जुनी आहे. या मशिदीच्या बाजूला बांधण्यात आलेल्या एमसीडीच्या मलेरिया ऑफिस देखील रेल्वे प्रशासनाने अशीच नोटीस दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT