HHT System to TC in Railways CHART boycatt for TICKET INSPECTIONS miraj
HHT System to TC in Railways CHART boycatt for TICKET INSPECTIONS miraj sakal
देश

रेल्वे प्रशासन प्रवाशांचा डेटा विकून 1000 कोटी कमावण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांच्या डेटाची विक्री करून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे. त्यासाठी सल्लागार सेवा घेण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. (railways plan to monetise passengers data)

रेल्वे ग्राहकांच्या व्यवहाराशी संबंधित डेटा देखील सल्लागाराला प्रदान केला जाईल. यामध्ये प्रवाशांची संख्या, प्रवाशांची श्रेणी, प्रवासाची संख्या, प्रवासाची वेळ, वयोगट, लिंग, पेमेंटची पद्धत आणि बुकिंगचा प्राधान्यक्रम याविषयी माहिती मिळेल. दस्तऐवजात असे म्हटले आहे की या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आयआरसीटीसीच्या डेटा बेसचा फायदा घेणे आहे, जेणेकरून कमाईच्या स्वरूपात आर्थिक लाभ घेता येईल. रेल्वेला प्रशासनाला डिजिटल डेटाच्या विक्रीतून 1,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता दिसत आहे.

पण गोपनीयतेशी संबंधित चिंतेमुळे रेल्वे प्रशासन माघार घेऊ शकतं, असे बोलले जात आहे. सोशल मीडियावर अनेक मूलभूत अधिकार संघटनांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर रेल्वेवर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. गोपनीयतेचा अधिकार गटांचे म्हणणे आहे की रेल्वे अशा प्रकारे आपल्या प्रवासी आणि मालवाहतूक ग्राहकांबद्दल गोळा केलेले तपशील विकू शकत नाही.

रेल्वेने या निविदेबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी, उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले की डेटा संरक्षण बिल अंतिम न झाल्याने हा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT