Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Congress Convention : मोदी अन् अदाणी एकच; काँग्रेसच्या अधिवेशनामधून राहुल गांधींचा निशाणा

संतोष कानडे

रायपूरः छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचं ८५वं अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसह गौतम अदाणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अधिवेशनामध्ये मनोगत व्यक्त करतांना राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान देशातल्या सगळ्या भागात जाण्याचं भाग्य मिळालं. या यात्रेतून मला खूपकाही शिकायला मिळालं. या यात्रेतून मला खूप प्रेम मिळाल्याचं गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस हे गौतम अदाणींना सुरक्षा देण्याचं काम करीत आहेत. त्यांची शेअर कंपनी हजारो कोटी रुपये परदेशात पाठवत आहे. तरीही सत्तेत असून नरेंद्र मोदी काही करु शकत नाहीयेत. मुळात अदाणी आणि मोदी एकच आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संघटनेशी संबंधित अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. यामध्ये आरक्षण, सदस्यत्व, एआयसीसी मेंबर, सीडब्ल्यूसी आणि संघटनेशी संबंधीत नियम बदलले आहेत. या माध्यमातून काँग्रेसने मोठी राजकीय खेळी केल्याचं निदर्शनास येतंय.

काँग्रेसमधील आरक्षण

पीसीसी आणि एआयसीसीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला ५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताम मंजूर करण्यात आला. तसेच आरक्षित आणि अनारक्षित जागांमध्ये ५० टक्के पदांवर महिला आणि ५० वर्षांखालील लोकांना संधी मिळणार आहे.

सदस्यत्वाशी संबंधित निर्णय

काँग्रेसमध्ये आता फक्त डिजिटल सदस्य नोंदणी होणार आहे. तसेच सदस्यत्व नोंदणी करतांना आई आणि पत्नीचं नाव जोडावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT