Raj Thackeray BrijBhushan Singh Sakal
देश

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; बृजभूषण सिंहांचा संतप्त निर्धार

राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून उत्तर प्रदेशातले भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांना तीव्र विरोध केला होता.

वैष्णवी कारंजकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. मात्र हा दौरा स्थगित झाल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अयोध्या दौरा स्थगित कशाला करायचा? आम्ही मदत केली असती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनीही या दौऱ्याच्या स्थगितीवर प्रतिक्रिया दिली आहे. (Brijbhushan Singh on Raj Thackeray Ayodhya visit)

उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार हे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांना विरोध करत होते. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. आता हा दौरा स्थगित झाल्यानंतर बृजभूषण म्हणाले की, माफी न मागणाऱ्या राज ठाकरेंनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. राज ठाकरे दुर्दैवी व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एक संधी होती, तीही हुकली. त्यांनी इथल्या जनतेची, योगींची, मोदींची माफी मागितली असती तर उत्तर प्रदेशच्या लोकांचा राग कमी झाला असता. माफी न मागता त्यांनी जुनी जखम पुन्हा ताजी केली आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे की माझा कोणताही कार्यक्रम स्थगित होणार नाही.

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आज सकाळी त्यांनी हा दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यामागे राज ठाकरे यांच्या प्रकृतीचं कारण असल्याचं मनसे समर्थकांचं म्हणणं आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं पुन्हा उफाळून आलं असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. ही शस्त्रक्रिया पुण्यातल्या सभेनंतर होणार असल्याची माहितीही मनसैनिकांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या कोणतंही कारण समोर आलेलं नाही. पुण्यात २२ मे रोजी होणाऱ्या या सभेमध्ये याबाबतचा खुलासा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे मातोश्रीवर दाखल, दीड तासापासून चर्चा सुरू

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT