Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election : राजस्थानमध्ये विधानसभा लढवणाऱ्या ७ उमेदवारांना आहेत दोन-दोन बायका, तिघांना पाचपेक्षा जास्त मुलं

राजस्थान निवडणुकीमध्ये उमेदवारांना दोन-दोन बायका, तिघांना पाचपेक्षा जास्त मुलं

संतोष कानडे

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये काही रंजक मुद्दे पुढे आलेले आहेत. काही उमेदवारांना दोन-दोन बायका आहेत तर काही उमेदवारांना पाचपेक्षा जास्त मुलं आहेत.

मेवाड-वागडमधील २८ पैकी ६ जागांवर, असे ७ उमेदवार आहेत ज्यांना प्रत्येकी दोन पत्नी आहेत. प्रतापगड मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी दोन बायका आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे.

प्रतिज्ञापत्रांमधून आणखीही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तीन उमेदवारांना तब्बल 5 पेक्षा जास्त मुलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये झाडोल येथील काँग्रेसचे हिरालाल दरंगी यांना ७ तर भाजपचे बाबूलाल खराडी यांना ५ मुले आहेत. खेरवाडा येथील भाजपचे नानालाल अहारी यांना ६ मुले आहेत.

दोन पत्नी असलेल्या उमेदवारांमध्ये उदयपूरच्या वल्लभनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयलाल डांगी यांना दोन पत्नी आहेत, तर खेरवाड्यातील काँग्रेसचे उमेदवार दयाराम परमार आणि झडोल येथील काँग्रेसचे उमेदवार हिरालाल दरंगी यांनाही प्रत्येकी दोन पत्नी आहेत. प्रतापगडमध्येही भाजपचे हेमंत मीणा आणि काँग्रेसचे रामलाल मीणा यांनीही उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात याचा उल्लेख केला आहे.

यासह बांसवाडा जिल्ह्यातील गढी येथील भाजपचे उमेदवार कैलाशचंद मीना आणि घाटोल येथील काँग्रेसचे उमेदवार नानलाल निनामा यांनासुद्धा दोन बायका आहेत. आदिवासी समुदायामध्ये बहुपत्नीत्व अजूनही रुढ आहे. इथे काही लोकांना २ तर काहींना ३ बायका असणे सामान्य मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT