rajsthan political News
rajsthan political News google
देश

सचिन पायलट-अशोक गेहलोत यांचा वाद चव्हाट्यावर

सकाळ डिजिटल टीम

भाजपने एक उमेदवार उभा केला असून हरियाणाचे खासदार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला आहे.

सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांसह देशपातळीवरीलही राजकारण तापलं आहे. देशात भाजपसह कॉंग्रेस आणि विविध राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, या निवडणुकीमुळे कॉंग्रसमध्ये अलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही राज्यातील कॉंग्रेस नेते नाराज आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री गेहलोत हे राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची बोलले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर राज्याची धुरा पायलट यांच्याकडे सोपवली जाणार आहे. असे असूनही मु्ख्यमंत्री गेहलोत राज्यसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राज्यातील 13 आमदारांपैकी 10 अपक्ष आमदारांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री गेहलोत आणि काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची भेट घेतली आहे. दरम्यान, या बैठकीत राजस्थानमध्ये 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि पक्षाचे उमेदवार मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुरजेवालाही उपस्थित होते. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार असून रिंगणात अनेक दिग्गज नेते आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे भाजपने एक उमेदवार उभा केला असून त्यांनी हरियाणाचे खासदार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला आहे. चंद्रा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तीन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला अपक्ष आमदार आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा अपेक्षित आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर बदलांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये निषेधाचे सूर उमटले आहेत. पक्षाचे म्हणणे आहे की, संघटनात्मक आणि सरकारी पातळीवर संभाव्य बदल केले जाऊ शकतात. तसेच मुख्यमंत्री गेहलोत यांची स्थानिक नेते आणि आमदारांवरील पकड सैल झाली असल्याची तक्रारही काँग्रेस हायकमांडला देण्यात आली आहे, असे असतानाही राज्यसभा निवडणुकीचे गणित मांडत गेहलोत हे पुन्हा एकदा आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT