ashok gehlot Sakal
देश

पंजाबनंतर राजस्थान काँग्रेसला धक्का; मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

माझा राजीनामा पाठवतोय, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असं म्हणत ओएसडींनी चेंडू गेहलोत यांच्या कोर्टात टाकला आहे.

पंजाबमध्ये राजकीय भूकंपानंतर आता राजस्थानमधलं वातावरण तापलं आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून काँग्रेस सावरण्याआधीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी मध्यरात्री राजीनामा मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सोपवला.

ओएसडी लोकेश शर्मा यांनी राजीनाम्याचे कारण ट्विटरवरून सांगिलते आहे. पंजाबमध्ये राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरु असताना त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजस्थानात राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. मजबूत को मजबूर, मामूली को मगरूर किया जाए...। बाड़ ही खेत को खाए, उस फसल को कौन बचाए असं ट्विट लोकेश शर्मा यांनी केलं होतं. आपल्या या ट्विटला राजकीय रंग दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटचा राजकीय अर्थ काढून त्याला पंजाबच्या राजकारणाशी जोडलं जात आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं.

लोकेश यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं की, मी २०१० पासून ट्विटरवर सक्रीय आहे. आतापर्यंत पक्षाच्या विचारधारेपक्षा वेगळं काही लिहिलं नाही की जे चुकीचं म्हणता येईल. मी माझ्या मर्यादा लक्षात ठेवल्या असून कोणतंही राजकीय ट्विट केलं नाही. तरीही तुम्हाला जर वाटत असेल की मी जाणीवपूर्वक काही चूक केली आहे तर माझा राजीनामा पाठवतोय, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असं म्हणत ओएसडींनी चेंडू गेहलोत यांच्या कोर्टात टाकला आहे.

पंजाबप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद वाढत गेले. अनेकदा दोघांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. तसंच त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींना यात हस्तक्षेप करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Dithwa : श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर आता 'दित्वा' चक्रीवादळाने भारताकडे वळवला मोर्चा!

School Holiday: राज्यात 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहणार; जाणून घ्या कारण काय

भारतातील सर्वात मोठे हॉटेल-कन्व्हेन्शन सेंटर नागपुरात बांधणार, कशी आहे रचना अन् सुविधा? वाचा संपूर्ण प्लॅन...

मला त्यांची प्रॉपर्टी नको फक्त त्यांची एक गोष्ट हवी... धर्मेंद्र यांच्या लेकीने सांगितली इच्छा; म्हणते-

Mumbai vs Vidarbha T20: आयुष म्हात्रे ऑन फायर! ८ षटकारांसह शतक अन सूर्या-दुबेची साथ; मुंबईचा विदर्भाविरुद्ध मोठा विजय

SCROLL FOR NEXT