Rajasthan Politics esakal
देश

Rajasthan Politics : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी घेतला मोठा निर्णय...

Political Earthquake in Rajasthan : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपप्रवेश केला आहे.

संतोष कानडे

Political Earthquake in Rajasthan : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपप्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राजधानी जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात या नेत्यांचा मेगा ज्वाईनिंग कार्यक्रम संपन्न झाला.

काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. राजस्थानच्या राजकारणात झालेल्या या भूकंपामुळे सगळी राजकीय समीकरणं बदलली आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये नागौरचे अनेक दिग्गज जाट नेते आहेत. त्यामुळे भाजपने २५ पैकी २५ जागांवर विजयाचा दावा केला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, अलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. कटारिया हे जसे गहलोत यांचे निकटवर्तीय आहेत, तसेच खिलाडीलाल बैरवा हे सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय रामपाल शर्मा हे माजी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचे अत्यंत जवळचे समजले जातात.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लालचंद कटारिया म्हणाले की, आंतरात्म्याच्या संकेतामुळे मी भाजपमध्ये सहभागी झालो आहे. मु्ख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.

भाजपमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये दोन माजी मंत्री, चार माजी आमदार सहभागी आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस् राबविलं जातंय. महाराष्ट्र, बिहारनंतर हिमाचल प्रदेशमध्येही कुरापती सुरु आहेत. त्यातच रविवारी राजस्थामध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT