rajastan congress sakal
देश

Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

राजस्थान निवडणुकीत काँग्रेसचा पक्षाचा मास्टर प्लॅन आणणार? विधानसभेत समर्थन वाढवण्याची योजना

सकाळ डिजिटल टीम

पूर्व राजस्थान कालवा प्रकल्पाला (इआरसीपी) राष्ट्रीय प्रकल्प म्हणून दर्जा देण्यात यावा, या मागणीवर काँग्रेसकडून जोर देण्यात येणार आहे. या माध्यमातून काँग्रेस या विभागातील विधानसभांच्या ८३ जागांवर पक्षाच्या पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पूर्व राजस्थानात १३ जिल्हे आणि ८३ मतदार संघांचा समावेश होतो. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने या विभागातून ८३ पैकी ४९ जागांवर विजय मिळवला होता,

तर भाजपला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीतही या जिल्ह्यांतील मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळावा अशी मागणी लावून धरण्याची योजना आखली आहे. काँग्रेसने पूर्व राजस्थानातील बरान या जिल्ह्यातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्याची योजना आखली आहे. या जिल्ह्याला 'इआरसीपी' चा लाभ होणार आहे. केंद्र सरकारने 'इआरसीपी' योजनेबाबत राजस्थानातील जनतेचा विश्वासघात केला आहे, या विरोधात आम्ही यात्रा काढणार आहोत' अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नुकतीच माध्यमांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune News: मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात निकृष्ट काम; ठेकेदाराचा खुलासा पुणे महापालिकेने फेटाळला

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT