Fire Accident Esakal
देश

Fire Accident: रात्रीच्या गाढ झोपेत 3 लहान मुलांसह संपूर्ण कुटुंब संपलं ! मध्यरात्री घराला लागली भीषण आग

Fire Accident: जयपूरच्या विश्वकर्मा येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Fire Accident: जयपूरच्या विश्वकर्मामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका घराला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विश्वकर्माच्या जैसल्या गावात घडलेल्या या घटनेत तीन निष्पाप मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सर्व मृत बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण केले आहे.

मधुबनी बिहारमधील एक कुटुंब जैसल्या गावात भाड्याने राहत होते. घरातील सर्व सदस्य झोपले असताना रात्री घराला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीपासून वाचण्यासाठी सर्वजण एका कोपऱ्यात गेले. मात्र,या दुर्घटनेत घरातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जळालेले मृतदेह बाहेर काढले. या सर्वांना पोस्टमॉर्टमसाठी एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. एफएसएलच्या टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. आगीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'विश्वकर्मा, जयपूर येथे लागलेल्या भीषण आगीमुळे 5 नागरिकांच्या अकाली मृत्यूची बातमी हृदयद्रावक आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो, या भीषण दुर्घटनेतील मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि कुटुंबातील सदस्यांना या परिस्थितीतून जाण्याची शक्ती मिळो. त्याचबरोबर जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT