Rajasthan government teeters to collapse as Deputy CM Sachin Pilot arrives in Delhi with 25 MLAs 
देश

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २५ आमदार दिल्लीत दाखल

अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेसच्या सत्तेला राजकीय हादरे बसणार असल्याचे चित्र सध्या जाणवू लागले आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. याबाबत रिपब्लिकने वृत्त दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन पायलट हे दिल्लीत हजर झाल्याने मध्य प्रदेशमधील राजकीय पॅटर्नची राजस्थानातही पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. तत्पूर्वी, राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या कथित प्रयत्नांच्या प्रकरणात पोलिसांच्या विशेष संचालन  गटाने चौकशी सुरू केली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. सरकारचे प्रमुख अधिकारी महेश जोशी यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमीत कमी १० ते १२ आमदार व इतरांनाही नोटिसा जारी करण्यात येणार आहेत. चौकशीत असे निष्पन्न झाले की, दोन ते तीन आमदार हे भाजपच्या वतीने इतर आमदारांना पैसे देऊन वळविण्यात सामील होते. त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष गटाने सरकार पाडण्याच्या प्रयत्नांबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन जण गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठीच्या घोडेबाजारात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT