Narendra Modi-Amit Shah esakal
देश

2023 मध्ये भाजप मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार; अमित शहा

सकाळ डिजिटल टीम

राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरुन सध्या भाजपमध्ये गदारोळ सुरू झालाय.

जयपूर : राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरुन सध्या राजस्थान भाजपमध्ये (Rajasthan BJP) गदारोळ सुरू झालाय. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काल रविवारी एक मोठी घोषणा केलीय. भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शाह म्हणाले, राजस्थानमध्ये भाजप 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. म्हणजेच, राजस्थानमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही. कारण, 2023 मध्ये भाजप प्रचंड बहुमतानं सत्तेवर येणार आहे, असा दावा त्यांनी केलाय.

राजस्थानमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी सुरू असलेला 'लढा' शहा यांनी संपवलाय. शाह यांनी जयपूर येथे भाजप राज्य कार्यसमितीच्या बैठकीत सांगितलं, की पक्ष 2023 मध्ये राजस्थानमधील पुढील विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवेल. शहा यांच्या या विधानाचा अर्थ असा, की राजस्थानमध्ये 2023 च्या निवडणुकीत कोणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसून सामूहिक नेतृत्वानं निवडणूक लढवेल आणि पंतप्रधान मोदी यांचा चेहरा असेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलाय.

गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी राजस्थानच्या अनेक भागात देव दर्शन यात्रा काढली. हे वसुंधरा राजे यांच्या ताकदीचं प्रदर्शन असल्याचं मानलं जातं. राजस्थानमध्ये 2023 साठी राजे यांना मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी राजे समर्थकांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. मात्र, शहांची ही घोषणा राजेंसाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, शाह यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर हल्लाबोल करत यूपी-गुजरात दौरा थांबवा आणि राजस्थानवर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला दिलाय. येत्या काळात 2023 मध्ये भ्रष्ट आणि निरुपयोगी सरकार जनता उलथून लावेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. राजस्थानमधील दोन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणूक आणि पंचायत निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर राजस्थान भाजपमधील गटबाजी वाढलीय. प्रदेश भाजपच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT