देश

Accident News : पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तब्बल पाच पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलंय. सर्व पोलिस कर्मचारी निवडणूक ड्यूटीसाठी जात असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिस जवान असलेली गाडी ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. सगळे जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जात होते. मागच्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. कितीही प्रयत्न केले तरी अपघात थांबत नाहीत. आजच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या सभेसाठी ड्यूटी लागल्याने नागौर जिल्ह्यातील खिंवसर ठाण्याचे पोलिस कर्मचारी गाडीमधून एकत्र निघाले होती. नागौरनंतर चुरु जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अपघात घडला. चुरूतल्या तारानगर येथे रविवारी पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या सभेसाठी पोलिस निघाले होते. दुर्दैवाने त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT