rajasthan over 100 prisoners are working at fuel pumps built on jail premises 
देश

कैदी झाले कर्मचारी; पेट्रोल पंपावर करतायेत मेहनत

शर्वरी जोशी

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायमच कारागृहातील प्रशासन प्रयत्न करत असतं. अनेक कारागृहांमध्ये हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी उद्योग सुरू करण्यात आले आहेत. यामध्येच राजस्थानमधील १०० कैद्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना पेट्रोल पंपावर काम  करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. याविषयीची माहिती तुरुंग अधिकारी राजीव दासोती यांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

राजस्थानमधील एका तुरुंगात असलेल्या १०० कैद्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेल परिसरात असलेल्या ६ पेट्रोल पंपावर १०० पेक्षा जास्त कैदी काम करत आहेत. या कैद्यांना दररोज पगार दिला जातो. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या कर्मचाऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांची शिक्षा कमी झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा बाहेर पडल्यावर काम करण्याची संधी मिळेल," असंही दासोती यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "येत्या काही काळात राज्यात १२ नवे पेट्रोलपंप उभारण्यात येणार आहेत. येथेदेखील कैद्यांना काम करण्याची संधी देण्यात येईल. सध्या या कैद्यांना २४९ रुपये प्रतिदिवस वेतन मिळत आहे.  हे वेतन थेट त्यांच्या बॅकेच्या अकाऊंटवर जमा होतात. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जयपूर पेट्रोल पंपावर १ कोटी रुपयांच्या पेट्रोलची विक्री झाली आहे."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT