देश

Chandrayaan 3: "चांद्रयान 3 मधून गेलेल्या प्रवाशांना सलाम"; राजस्थानचे क्रीडामंत्री झाले ट्रोल

नेटकऱ्यांनी त्यांच्या या विधानावरुन त्यांची खिल्ली उडवली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chandrayaan 3: चांद्रयान ३ मोहिम यशस्वी ठरल्यानं भारताचं नाव जगात मोठं झालं आहे. यावर देशभरातून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण यांपैकी राजस्थानच्या क्रीडा मंत्र्यानं दिलेल्या प्रतिक्रियेवरुन ते ट्रोल झाले आहेत. त्यांचं विधान ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. (Rajasthan Sports Minister Ashok Chandna troll by Social Media users while comment of Chandrayaan 3)

काय घडलं नेमकं?

चांद्रयान ३च्या यशस्वीतेवर माध्यमाच्या प्रतिनिधींनी राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदना यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलतना ते म्हणाले, "आपण यशस्वी झालो, सुरक्षित लँडिंग झालं. या यानासोबत जे आपले प्रवाशी गेले आहेत, त्यांना सलाम करतो. तसेच आपला देश विज्ञान आणि अंतराळ संशोधनात पुढे गेला याची सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो" (Latest Marathi News)

ट्रोल का झाले?

चांद्रयान ३ मोहिम लॉन्च झाल्यापासून माध्यमांमधून सातत्यानं त्यासंबंधीची बारीक सारीक संपूर्ण माहिती जनतेसमोर येत होती. स्वतः इस्त्रोनं ही मोहिम कशी असेल त्याचा उद्देश काय असेल ते त्याचा फायदा काय? इथंपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तर दिली होती. यामध्ये चांद्रयान ३ हे मानवविरहित असल्याचंही स्पष्ट होतं. या यानासोबत केवळ विक्रम लँडर आणि एक रोव्हर हे दोन यंत्रच चंद्रापर्यंत पोहोचणार होते. (Marathi Tajya Batmya)

यांपैकी विक्रम लँडरवर रोव्हरला सुखरुपणे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचवायची कामगिरी होती. ही कामगिरी या यंत्रानं चोख बजावली. त्यानंतर रोव्हर चंद्राचा अभ्यास करण्याचं पुढील काम करणार असून त्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्त्रो) पोहोचवणार आहे.

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

म्हणजेच चांद्रयान ३ मोहिमेत प्रत्यक्ष चंद्रावर कोणीही माणूस जाणार नसल्याचं संपूर्ण जागाला माहिती असताना राजस्थानच्या मंत्र्यांना याची माहिती नसल्यानं नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हिडिओ बाईटवरुन खिल्ली उडवली असून त्यांना ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT