rape case  File photo
देश

विकृती! ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

आरोपी किशोरवयीन असून क्रौर्याबरोबरच मानसिक विकृती यातून दिसून येते.

दीनानाथ परब

जयपूर: महिलांविरोधात घडणारे अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे (laws) बनवण्यात आले आहेत. पण त्यानंतरही महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या (rape) घटना कमी झालेल्या नाहीत. उलट त्यामध्ये वाढच होत आहे. आता राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्काराचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रौर्याबरोबरच आरोपीची मानसिक विकृती यातून दिसून येते. बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर किशोरवयीन (teen) आरोपीने ६० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. आरोपीने त्यानंतर वृद्ध महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

राजस्थानच्या हनुमानगडमधील पीलीबंगा शहरात ही घटना घडली. आरोपीने दारुच्या नशेत महिलेच्या घरात प्रवेश केला. बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली व त्यानंतर पुन्हा महिलेवर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. घरी ती एकटीच राहत होती. तिला मूल-बाळ नाहीय.

"बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वहिनी घरी आली होती. आरोपी घरी आला होता व त्याने वाईट हेतुने छेडछाड केल्याचं तिने सांगितलं. तिने आरोपीला धमकावलं, तेव्हा तो मोबाइल उचलून पळाला" असं मृत महिलेच्या दीराने पोलिसांना सांगितलं. आउटलुकने हे वृत्त दिलं आहे.

"वहिनीने आरोपीकडून मोबाइल परत मिळवून देण्याची विनंती केली. रात्रीची वेळ असल्याने आपण सकाळी आरोपीकडून मोबाइल मिळवून देतो असे सांगितले. तिला रात्री घरीच थांबण्यास सांगितले. पण घरी गुरं आणि म्हशी असल्याने वहिनीला घरी जावे लागले" अशी माहिती दिराने पोलिसांना दिली. आरोपीने रात्री एकच्या सुमारास दारुच्या नशेत गावातील एका व्यक्तीला महिलेला गळा दाबून मारल्याचं सांगितलं. त्यानंतर महिलेचा दीर आणि अन्य गावकरी घरी गेले, त्यावेळी महिला मृतावस्थेत आढळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येणार? तोडगा निघण्याची शक्यता!

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

SCROLL FOR NEXT