Rajeev Gandhi Birth Anniversary 
देश

Rajeev Gandhi Birth Anniversary : पित्याची जयंती, पुत्र पोहोचला लडाखमध्ये! पँगाँग सरोवरावर केलं अनोखं अभिवादन; पण नेमकं असं का?

देशाचे माजी पंतप्रधान आणि नेहरू घराण्यातील तिसरे पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि नेहरू घराण्यातील तिसरे पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे पुत्र राहुल गांधी हे थेट लडाखमध्ये पोहोचले आहे. दुचाकीवरून त्यांनी दिल्ली ते थेट लडाख असा प्रवास केला आहे. तर आज पित्याच्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले आहे.

Rajeev Gandhi Birth Anniversary

दरम्यान, राहुल गांधी हे काल दुचाकीवरून लडाखमधील पँगाँग सरोवर येथे गेले होते. "जगातील सर्वांत सुंदर जागा म्हणजे लडाखमधील पँगाँग सरोवर असं वडील राजीव गांधी म्हणायचे. म्हणून मी आज त्याच मार्गावर आहे" असं म्हणून त्यांनी काल फोटो शेअर केले होते. तर आज त्यांनी या ठिकाणी जाऊन आपल्या वडिलांना अभिवादन केलंय.

Rajeev Gandhi Birth Anniversary

पण असं का?

दिवंगत राजीव गांधी यांची आवडती जागा म्हणजे पँगाँग सरोवर ही आहे. म्हणून राहुल गांधी यांनीसुद्धा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले आहे. त्यांच्यासोबत लहान लहान मुले, महिलासुद्धा उपस्थित आहेत.

Rajeev Gandhi Birth Anniversary

राहुल गांधी यांनी केले फोटो शेअर

"बाबा, भारतासाठी तुमची जी स्वप्ने होती ती या अनमोल आठवणींतून ओसंडून वाहतात. तुमच्या जखमा हा माझा मार्ग आहे - मी प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकतोय." असं कॅप्शन टाकून त्यांनी अभिवादनाचे फोटो शेअर केले आहेत.

बौद्ध भिक्खूंचा सन्मान

राहुल गांधी हे सध्या लडाख येथे असून त्यांनी लडाख प्रदेशातच राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी बौद्ध भिक्खूंकडून या प्रतिमेची पूजा करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून बौद्ध भिक्खूंचे आदरातिथ्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT