RAJIV GANDHI AND SONIYA GANDHI 
देश

Love Story : सोनिया गांधींना पहिल्या नजरेत राजीव यांच्यावर झालं होतं प्रेम

सकाळन्यूजनेटवर्क

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांचा इटलीमध्ये जन्म झाला. कँब्रिज (Cambridge)मध्ये शिकत असताना त्यांना राजीव गांधींशी (Rajiv Gandhi) प्रेम झाले. त्यांच्या या प्रेम कहानीमध्ये अनेक चढ-उतार आले, पण अखेर त्यांचे लग्न झाले. अशी होती त्यांची लव्ह स्टोरी...

सोनिया गांधी 7 जानेवारी 1965 साली कँब्रिजमध्ये आल्या. त्यांनी येथील एका स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले आणि तेथेच एका प्लॅटमध्ये त्या राहू लागल्या. येथील जेवण त्यांना चांगले वाटले नाही, सुरुवातीला त्यांना इंग्रजी बोलतानाही अडचण येत होती. काही दिवसानंतर त्यांना जवळच एक ग्रीक हॉटेल सापडले. या हॉटेलचे नाव होतं वर्सिटी. राजीव गांधीही आपल्या मित्रांसोबत याठिकाणी यायचे. 

याच हॉटेलमध्ये सोनियांनी पहिल्यांदा राजीव यांना पाहिलं होतं. राजीव शांत आणि सुंदर होते. तसेच ते विनम्रही होते. जेव्हा सोनिया गांधी याठिकाणी लंच करत होत्या त्यावेळी त्यांचा एका कॉमन मित्र क्रिस्टियन वॉन स्टीगलिज यांच्यासोबत राजीव तेथे आले. त्याचवेळी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा परिचय झाला. 

''सोनिया गांधी- एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ, अँड इंडियन डेस्टिनी'' sonia gandhi an extraordinary life an indian destiny या पुस्तकात म्हणण्यात आलंय की सोनिया यांना पहिल्याच नजरेत राजीव यांच्यासोबत प्रेम झाले. राजीव गांधींसोबतही असंच घडलं

पहिल्या भेटीनंतर राजीव आणि सोनियांची मैत्री झाली. त्यांची मैत्री हळूहळू घट्ट होऊ लागली. राजीव गांधी आपली आई इंदिरा गांधी यांना पत्र लिहायचे. यावेळी पत्रात ते सोनिया गांधींचा उल्लेख करायचे. राजीव गांधी आपल्या लाल रंगाच्या वॉक्सवेगन कारमधून दररोज सोनिया गांधींना भेटायला जायचे. राजीव गांधी त्यावेळी एका बेकरीमध्ये पार्ट टाईम काम करायचे.

मोदी सरकारलाच घ्यावी लागेल माघार, शेतकरी हटणार नाहीत- राहुल गांधी

राजीव गांधी यांनी इंदिरा गांधींसमोर सोनिया यांच्याबाबत वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. राजीव गांधी यांनी इंदिरा आणि सोनिया यांची भेट लंडनमध्ये घडवून आणली. पण, सोनिया यांच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. असे असले तरी सोनिया आणि राजीव यांनी आयुष्य सोबत घालवण्याचा पक्का इरादा केला होता. 1966 मध्ये सोनिया इटलीला परत गेल्या. त्यानंतर राजीव गांधींनी इटलीमध्ये जाऊन सोनिया यांच्या घरच्यांची भेट घेतली. त्यानंतर सोनिया यांच्या वडिलांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. एक वर्षांपर्यंत त्यांना लग्न न करण्यास सांगितलं आणि या काळात त्यांच्यातील प्रेम कायम राहिले, तर ते लग्नाला होकार देतील, असं वडिलांनी म्हटलं. 

एका वर्षानंतर सोनिया गांधी दिल्ली एअरपोर्टवर उतरल्या

सोनिया गांधी एक वर्ष इटलीमध्ये राहिल्या, पण या काळात त्या राजीव यांना विसरु शकल्या नाहीत. 13 जानेवारी 1968 साली त्या दिल्ली एअरपोर्टवर उतरल्या. त्यांना घेण्यासाठी राजीव गांधी आपले बंधू संजय यांच्यासोबत आले होते. सोनिया गांधी अमिताभ बच्चन यांच्या घरी थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT