Rajiv Gandhi Assassination  Sakal
देश

Rajiv Gandhi : भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींच्या वडिलांच्या खुन्यांची मुक्तता

शिक्षा पूर्ण होण्याआधीच आता त्यांची मुक्तता होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचलेली आहे. याच दरम्यान, आता त्यांचे वडील आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या खुन्यांची सुटका होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची वागणूक समाधानकारक असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी पू्र्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्य़ाची परवानगी दिली आहे.

प्रियंका गांधी वड्रा यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या हत्येतली आरोपी नलिनी श्रीहरनची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रडत रडत आपल्या वडिलांच्या हत्येबद्दल जाबही विचारला होता. तर सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. देशभर त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. सध्या त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, RBI गव्हर्नरनीसुद्धा व्यक्त केली भीती

Latest Marathi News Live Update : ‘भोंदू खरात’ प्रकरणात अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

आता रंगभूमीवर रंगणार जोडीचा मामला ! सचिन पिळगावकरांच्या उपस्थितीत नव्या नाटकाची घोषणा

स्टार प्रवाह पाठोपाठ झी मराठीनेही केली नव्या मालिकेची घोषणा ! गाजणाऱ्या कन्नड मालिकेचा रिमेक मराठीत

'राजा शिवाजी' चित्रपटासाठी अभिषेक बच्चनने मानधन का नाही घेतलं? सांगितलं खरं कारण, म्हणाला, '

SCROLL FOR NEXT